जळगावात कॉस्मेटिक गोडाऊन फोडले ; १९ लाख लंपास

0

जळगाव प्रतिनिधी । शहरातील दूध फेडरेशन परिसरात असलेल्या एस.के.ऑइल मिल समोरील एका ट्रेडिंग कंपनीच्या गोडावून मधून १९ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना आज उघडकीस आली आहे.याबाबत माहिती अशी की, राजीव हरिओम अग्रवाल (रा. दूध फेडरेशन परिसर जळगाव) यांचे सावरिया ट्रेडिंग कंपनी व सावरिया कंझुमर केअर नावाचे एस.के.ऑइल मिल समोर गोडाऊन आहे. या गोडाउन मध्ये होलसेल कॉस्मेटिक वस्तूंचे सामान भरलेला असतो. नेहमीप्रमाणे त्यांनी बुधवारी रात्री नऊ वाजता गोडाऊन बंद करून गेले होते. त्यावेळी त्यांनी गोडाउनमधील ऑफिसमध्ये १९ लाख १८ हजार रुपयांची रोकड ठेवलेली होती. आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी गेले असता शटर उचकवून चोरी झाल्याचे लक्षात आले.

दरम्यान, या प्रकरणी शहर ठाण्याचे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला या प्रकरणी राजीव हरिओम अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here