जळगाव :-शहरातील काव्यरत्नावली चौकात आज पहाटे एमएच १९ सीझेड : १५३२ या क्रमांकाची कार झाडाला धडकल्याने झालेल्या अपघातात चालकासह एक जण जखमी झाला आहे.
जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौकात भरधाव कारवरील (क्रमांक एमएच १९ सीझेड : १५३२) ताबा सुटल्याने एचडीएफसी बँकेसमोर झाडाला धडक दिल्याची घटना पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. यात चालकासह एक जण किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने पहाटे रस्त्यावर कोणीही नसल्याने कोणालाही हानी झालेली नाही. तसेच गाडीतील एयरबॅग्ज वेळीस उघडल्याने चालक आत्याच्या सोबतच्या व्यक्तीला गंभीर जखमा झाल्या नाहीत.