जळगावात कपड्याचे दुकान फोडले

0

जळगाव :- शहरातील खान्देश कॉम्प्लेक्समध्ये कपड्याचे दुकान फोडून चोरट्यांनी महागड्या जीन्स आणि शर्ट्स लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडलीस आली.

खान्देश कॉम्प्लेक्समध्ये जावेद फारुख खान यांच्या मालकीचे फ्रेंड्स मेन्स वेअर नावाने कपड्यांचे दुकान आहे. मंगळवारी रात्री १०.३० वाजता ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास शटरचे कुलूप तोडून एका बाजूने शटर उचकवून दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातून २८ आणि ३२ साईजच्या ३० जीन्स पॅन्ट व एम साईजचे ४० शर्ट चोरून नेले. हा प्रकार सकाळी उघडकीस आला. दरम्यान, घटनास्थळी शहर पोलीस स्थानकाचे कर्मचारी सुधीर साळवे आणि रतन गिते यांनी पाहणी केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.