Saturday, December 3, 2022

जळगावात आजपासून तीन दिवसाआड पाणी

- Advertisement -

जळगाव :- तीव्र उन्हाळ्याचे दिवस आणखी पुढे असताना जळगावकरांना मात्र आतापासूनच तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. जळगाव शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या वाघुर धरणात 20 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता महापालिकेने आजपासून तीन दिवसाआड चौथ्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

सद्यस्थितीत जळगाव शहराला दोन दिवसाआड तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. शासनाने जळगाव शहरासाठी मंजूर केलेल्या पाणी आरक्षणाच्या अनुषंगाने 15 जुलै पर्यंत आहे तो पाणीसाठा पुरविणे गरजेचे असल्यामुळे चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त झाले आहे. आज ९ एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार आहे. नागरिकांनी भविष्यात होणारी पाणीटंचाई लक्षात घेता काटकसरीने पाण्याचा वापर करावा असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी केले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

मंगळवारी या भागात होईल पाणीपुरवठा

सुप्रिम कॉलनी, गणेशवाडी, हेमुकलाणी परिसर, कासमवाडी, म्हाडा कॉलनी, गृहकुल हौसिंग सोसायटी, रायसोनी शाळा परिसर, अजिंठा हौसिंग सोसायटी, शांती निकेतन कॉलनी, ब्रुक बॉन्ड कॉलनी, अंनत हौसिंग सोसायटी, प्रभात कॉलनी, ईश्वर कॉलनी, वर्षा कॉलनी परिसर, डी.एस.पी टाकी – जिल्हारोड, गिरणाटाकी उंच टाकी – भगवाननगर, रामानंदनगर, अंबिका सोसायटी, ईकबाल कॉलनी, मिल्लतनगरग, जोशीवाडा.

बुधवारी या भागात होईल पाणीपुरवठा

नटराज टाकी ते चौघुले मळा पर्यंतचा भाग, शनिपेठ, बळीरामपेठ, नवीपेठ, हौसिंग सोसायटी, शाहूनगर, प्रतापनगर, गेंदालाल मिल टाकीवरील भाग – खडकेचाळ, इंद्रप्रस्थनगर, के.सी.पार्क, गेंदालाल मिल हुडको, रिंगरोड संपूर्ण – भोईटेनगर, भिकमचंद जैन नगर, आकाशवाणी टाकीवरील संपूर्ण भाग – जुनेगाव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज, ओंकारनगर, जोशीपेठ, गिरणा टाकी आवारातील उंच टाकी, वाघनगर, हरिविठ्ठल नगर, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी परिसरातील भाग, डी.एस.पी.टाकीवरुन – तांबापुरा, गणपतीनगर, आदर्शनगर, डी.एस.पी.बुस्टर – (नित्यानंद जलकुंभ) नित्यानंद नगर, समतानगर, स्टेट बँक कॉलनी.

गुरुवारी या भागात होईल पाणीपुरवठा

वाल्मिकनगर, कांचननगर, दिनकर नगर, आसोदा रोड व परिसर, खंडेरावनगर परिसर – हरिविठ्ठलनगर, पिंप्राळा गावठाण परिसर, मानराज टाकीवरील भाग – दांडेकर नगर, मानराज पार्क, असावा नगर, निसर्ग कॉलनी, खोटेनगर टाकीवरील भाग – मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलीस कॉलनी परिसर, खोटेनगर, गेंदालाल मिल टाकीवरील – शिवाजीनगर हुडको, प्रजापतनगर, एस.एम.आय.टी.परिसर, डायरेक्ट – योगेश्वर नगर, हिरा पाईप, शंकरराव नगर, खेडीगाव परिसर, डी.एस.पी.बायपास – तांबापुरा, शामाफायर समोरील परिसर, शिवकॉलनी, विद्युत कॉलनी, राका पार्क, श्रीधरनगर, श्री.रुख्मीणीनगर पोस्टल कॉलनी, विवेकानंद नगर व इतर भाग, डी.एस.पी. टाकीवरील, पहिला दिवस – महाबळ, मोहनगर, आनंदनगर, नागेश्वर कॉलनी, मेहरुण पहिला दिवस – अक्सा नगर, रामेश्वर कॉलनी, गणेशपुरी, मलिकनगर, रामनगर नित्यानंदनगर टाकी (बुस्टर) – मोहन नगर, गायत्रीनगर, नेहरु नगर.

शुक्रवारी या भागात होईल पाणीपुरवठा

खंडेरावनगर दुसरा दिवस – पिंप्राळा गावठाण उर्वरित भाग, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बँक कॉलनी, आशाबाबा नगर, पिंप्राळा टाकी मानराज टाकी दुसरा दिवस – शिंदेनगर, अष्टभुजा, वाटीका आश्रम परिसरातील राहिलेला भाग, खोटेनगर टाकीवरील राहिलेला भाग – निवृत्तीनगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर, निमखेडी राहिलेला भाग, नित्यानंद टाकी दुसरा दिवस – नित्यानंदनगर, संभाजीनगर, रायसोनी नगर, समतानगर परिसरातील उर्वरित भाग, जाकिर हुसेन कॉलनी, डी.एस.पी.टाकी – इंद्रप्रस्थनगर, यशवंतनगर, श्रद्धा कॉलनी, टेलिफोन नगर, सानेगुरुजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंतनगर परिसरातील उर्वरित भाग, ऑफीसर क्लब टाकी परिसर, गिरणा टाकी आवारातील उंच टाकी, कोल्हेनगर, शिवकॉलनी व इतर परिसर, मेहरुण भागातील राहिलेला परिसर (बुस्टर पंप स. 4 वा. सुरु) मेहरुण गावठाण, दत्तनगर, लक्ष्मीनगर, इकबाल कॉलनी, एकनाथनगर, मंगलपुरी परिसर, अयोध्यानगर, सतगुरु नगर, हनुमान नगर, लिलापार्क, गौरव हॉटेल परिसर.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या