जळगाव :- औरंगाबादनंतर जळगावमधील काही भागांमध्ये एक अनोळखी अळ्यांचा झुंड पाहायला मिळत आहे. लांबून पाहिल्यास साप असल्याचा भास होतो, मात्र जवळून पाहिल्यावर छोट्या अळ्या असल्याचं लक्षात येतं. अशा अळ्या यापूर्वी पाहिल्या नसल्याने नागरिकांमध्ये भीती आणि कुतूहल निर्माण झालं आहे.
शहरातील गणेश कॉलनी परिसरातील एका बागेत या अळ्या आढळल्या. सापाच्या आकाराने चालत असलेल्या लाखो अळ्यांचा कळप निघाल्याने बघ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती. पहिल्यांदा अशा प्रकारच्या अळ्या दिसून आल्याने संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनला आहे.