Monday, September 26, 2022

जळगावातील २० एसटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

- Advertisement -

गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना शेवटचा अल्टिमेटन देवूनही माघार न घेतलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या २० कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्याचे आदेश आगार प्रमुख भगवान जगनोर यांनी काढले आहे. दरम्यान, सेवा समाप्ती झाल्यावर देखील दु:ख न मानता सेवा समाप्ती निर्णयाचे एसटी कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या अंगावर फुलांचा वर्षाव करत शासनाने दिलेल्या शेवटच्या अल्टिमेटमच अनोख आंदोलन करत स्वागत केले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

यात १२ चालक, ७ वाहक आणि १ सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश आहे. यावेळी एसटी कर्मचारी म्हणाले की, मेस्माची कारवाई असो की निलंबनाची कारवाई आम्ही कारवाईला घाबरत नाही. शासनाने कारवाई करत राहावे, आम्ही या कारवाईचा फुलांप्रमाणे स्वीकार करू असे, म्हणत जळगाव आगारातील कर्मचाऱ्यांनी स्वत च्या हाताने स्वत: च्या अंगावर फुलांचा वर्षाव करत अनोखा पध्दतीने कारवाईचा निषेध व्यक्त केलाय. मात्र आंदोलनावर आम्ही शेवटपर्यंत ठाम असल्याचंही प्रशासनाला दाखवून दिले.

सोमवारी जळगाव आगारात करण्यात आले आहे. शासनाने बस कर्मचाऱ्यांना सेवेत हजर होण्यासाठी शेवटचा अल्टिमेटम दिलेला आहे. यापूर्वीही अनेक कारवाईचे आदेश आले. मात्र त्यानंतरही कर्मचारी संपावर तसेच त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. आज जळगाव आगारात संपकरी बस कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या हाताने स्वत :वर फुलांचा वर्षाव करत अनोखे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. शासनाने कितीही कारवाई केली. तरीही आम्ही त्याला घाबरत नाही आणि जोपर्यंत एसटी विभागाच्या शासनात विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत मागण्यांवर तसेच आंदोलनावर ठाम असल्याचंही कर्मचार्‍यांनी  सांगितले

  २० कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती

आधार गोमा नन्नवरे, रजनिकांत लोटू साळुंखे, गोकुळे धुडकू नन्नवरे, शंकर सुकदेव सोनवणे, लक्ष्मण तुळशीराम कोळी, लक्ष्मण रामदास नन्नवरे, मोतीलाल पांडूरंग नन्नवरे, झेंडू रामा सोनवणे, राजेंद्र दामोदरे सपकाळे, रवीकिरण पिंताबर सुर्यवंशी, युवराज राजाराम पाटील, शरद तुळशीराम सोनवणे, सुधाकर गंगाराम सोनवणे, ज्ञानेश्वर यशवंत सोनवणे, ज्ञानेश्वर भगवान सोनवणे , सुनिल तानकू पाटील, गोविंद सुकलाल ठाकरे, अशोक आत्माराम सोनवणे, प्रकाश रामचंद्र सोनवणे, वसंत बुधा पाटील या वीस कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या