जळगाव । जळगावातील बीएचआर मल्टी-स्टेट सहकारी बँकेचे अवसायक कंडारे यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे. ही छापेमारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज सकाळी टाकल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
शिवाजीनगर भागात कंडारे यांचे घर असून आज सकाळपासून त्यांच्या निवासस्थानी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासणी सुरू केली आहे. ही तपासणी नेमकी कोणत्या कारणासाठी करण्यात येत आहे याची माहिती मात्र अद्याप देण्यात आलेली नाही. या कारवाईने खळबळ उडाली आहे.