जळगाव : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगची सक्ती करण्यात आली आहे. मात्र, या नियमाची पायमल्ली केली जात असल्याचे चित्र जिल्ह्यात समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसल्याने जळगाव शहर, अमळनेर , भुसावळ आणि चाळीसगाव येथील बाजार समित्यांचे व्यवहार पुढील आदेशापर्यत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी काढले आहे.
दरम्यान, आज जळगावातील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्याने परिसरात सुकसुकाट पाहायला मिळाले. या समितीत मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दोन-तीन दिवसात पाहण्यात आले होते. त्यानंतर जिल्हाधिकार्यांनी जळगाव शहरासह जिल्ह्यातील चार ठिकाणचे बाजार समित्यांचे सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.