जळगाव प्रतिनिधी । शहरातील गेंदालाल मिल परिसरात तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. राहुल सिध्दार्थ गाढे (वय-२०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, जिल्हा रूग्णालयात मृतदेह आणण्यात आला असून नातेवाईकांचा प्रचंड आक्रोश केला.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राहुल गाढे हा आपल्या आईवडील व भाऊ-बहिणीसोबत राहतो, आज सकाळी भाऊ रोहित व वडील सिध्दार्थ गाढे हे कामाच्या निमित्ताने बाहेर गेले होते. तर आई बाहेर गेली होती. त्याचे घर दोन मजली असल्यामुळे राहुल गाढे यांने घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. मुलाने आत्महत्या केल्याचे पाहुन आईने हंबरडा फोडत प्रचंड धक्का बसला. यावेळी शेजरच्यानी तातडीने उतरवून जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. जिल्हा रूग्णालयात मोठी गर्दी जमली आहे.