Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जळगावमध्ये साडेचार किलो गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल
    गुन्हे वार्ता

    जळगावमध्ये साडेचार किलो गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

    Tushar BhambareBy Tushar BhambareAugust 4, 2021No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    जळगाव  शहरातील आर.एल.चौफुलीवर बेकायदेशीररित्या गांजा विक्री करणाऱ्या तरूणाला पोलीसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातील १३ हजार ४५५ रूपये किंमतीचा साडेचार किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    जळगाव ते औरंगाबाद रोडवरील आर.एल.चौफुलीवर बेकायदेशीररित्या आर.एल. चौफुलीवर मंगळवारी ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास एकजण विक्री करत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार संशयित आरोपीवर कारवाई करण्याच्या सुचना पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्यात. पोलीसांनी कारवाई करत हातात पाकीट घेवून गांजाची विक्री करतांना संशयित आरोपी बबलू उर्फ टारझन अरूण दहेकर (वय ३२, रा. जाखनीनगर कंजरवाडा जळगाव) आढळून आला. त्याची प्राथमिक चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून १३ हजार ४५५ रूपये किंमतीचा ४ किलो ४८५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांच्या फिर्यादीवरून तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पो.ना. इम्रान सैय्यद, हेमंत कळसकर, सुधीर साळवे, पो.कॉ. गोविंदा पाटील, पो.कॉ. चंद्रकांत पाटील, सचिन पाटील यांनी कारवाई केली.

     

    crime news jalgaon news latest news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या

    July 20, 2026

    शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी

    July 20, 2026

    सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू

    July 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif