जळगावमध्ये तीन पत्ती जुगार अड्ड्यावर धाड; ११ जणांना अटक 

0

जळगावमध्ये तीन पत्ती जुगार अड्ड्यावर धाड; ११ जणांना अटक 

शहर पोलीस स्टेशनची कारवाई

 

जळगाव (प्रतिनिधी):शहरातील लाकूडपेठ परिसरात पथदिव्याच्या उजेडात सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी शनिवारी (दि. २१ एप्रिल) रात्री धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत एकूण ११ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून १३ हजार ८८० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

शिवाजीनगर येथील लाकूडपेठ भागात रात्रीच्या वेळी उघड्यावर सुरू असलेल्या जुगार खेळाबाबतची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सपोनि शीतलकुमार नाईक, पोउनि महेश घायतड, रामचंद्र शिखरे, सहाय्यक फौजदार सुनील पाटील, पोहेकॉ किशोर निकुंभ, पोकों उद्धव सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले.

पथकाने तत्काळ कारवाई करत लाकूडपेठ परिसरात छापा टाकला असता, तेथे तीन पत्ती जुगार खेळत असलेल्या ११ जणांना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी त्या ठिकाणाहून जुगार खेळात वापरले जाणारे साहित्य व एकूण १३,८८० रुपयांची रोकड जप्त केली.

या प्रकरणी पोकों प्रणव पवार यांच्या फिर्यादीवरून संबंधित ११ जणांविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.