जळगावतून मोबाईल चोरट्याला अटक; स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई

0

 

जळगाव :-शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तीन मोबाईल चोरी प्रकरणी सम्राट कॉलनी येथील एका चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. राकेश जगताप राहणार सम्राट कॉलनी असे आरोपीचे नाव आहे.

 

पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, जळगाव, अपर पोलीस अधीक्षकचंद्रकांत गवळी, जळगाव, उप विभागीय पोलीस अधिकारी. संदिप गावीत, जळगाव जिल्हा यांनी जिल्ह्यात मोबाईल चोरी संदर्भात गुन्ह्यांची वाढ झाली असल्याने सदरचे गुन्हे उघडकिस आणणे चाबत एलसीबी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील, यांना आदेश दिले होते,

वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगावचे किसन नजनपाटील, यांनी सफी विजयसिंग पाटील, अकरम शेख, सुधाकर अंभारे, महेश महाजन, लक्ष्मणमा.चंद्रकांत पाटील, संदिप सावळे, विजय पाटील, किरण चौधरी, ईश्वर पाटील, सर्व नेम स्थागुशा जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते. मा. श्री किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना गोपनीय

बातमीदारा मार्फत मिळालेल्या गोपनीय माहिती वरुन जळगाव शहर पो.स्टे. २४४/२०२३ भादवि कलम ३८० मधिल दाखल गुन्ह्यातील गेलेले ३ मोबाईल हे सम्राट कॉलनी जळगाव येथील राकेश जगताप याने चोरी केल्याचे समजुन आल्याने वर पथकाने त्याचा शोध घेता तो महादेव मंदिरा जवळ मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने शिवाजीनगर भागातील राजाराम नगर कडील बौध्दविहारा जवळून चोरून नेलेले ३ मोबाईल बाबत विचारपुस केली असता त्याने सदर घरफोडी बाबत कबुली देवून चोरून नेलेले ५९५९९/- रु. कि.चे ३ मोबाईल काढून दिल्याने ते गुन्ह्याकामी जप्त करून आरोपी राकेश कैलास जगताप, वय २०, रा. सम्राट कॉलनी जळगाव यास व ५९५९९/- रु. कि.चे ३ मोबाईल जळगाव शहर पो.स्टे. २४४/२०२३ भादवि कलम ३८० या गुन्ह्याचे पुढील तपासकामी जळगाव शहर पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.