मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई तर्फे राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र यूथ आयडॉल कलारत्न पुरस्कार 2021 शिवानी जोशी पाठक जळगाव यांना जाहिर
शिवानी पाठक ही जळगावकर नृत्यांगना गेल्या बारा वर्षापासून नृत्य साधनेत आहे. त्याच प्रकारे नवनवीन उच्चांक शास्त्रीय नृत्य कलेत गाठत आहे याच वर्षी गांधर्व विद्यालयातून विशारद पदवी घेऊन पद्मश्री डॉक्टर पुरू दधीच यांच्या कथ्थकशास्त्र पदव्युत्तर डिप्लोमा मध्ये विशेष योग्यता श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन स्वतःचा शोधनिबंध ही आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केला आहे .
शिवानी ने जळगावकरांचा अभिमान उंचावला आहे.
सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी तिला शुभेच्छा दिल्या.
शिवानी पाठक हिने आत्तापर्यंत पुणे, इंदोर, मुंबई, देवरुख, अलिबाग येथील येथील अनेक संस्थांबरोबर आपले नृत्याविष्कार सादर केले आहेत, काही व्यवसायिक मोठ्या बजेटच्या गाण्यांमध्येही आपल्याला शिवानीच्या कथक नृत्य आविष्काराची झलक पाहायला मिळेल व जळगाव मध्ये इतर शास्त्रीय नृत्य कला प्रकारात प्रेरणा म्हणून शिवानी चे काम स्तुतीतुल्य आहे.