जळगांव शहरातील सर्व दुकाने सम-विषम पद्धतीने होणार सुरू

0

जळगाव, प्रतिनिधी – शहरातील दुकाने दि.५ जून पासून सम-विषम तत्त्वावर सुरू करण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी याबाबत आज आदेश जारी केले आहेत.  शुक्रवारपासून (दि.५) सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत शहरातील दुकाने उघडता येणार आहेत. सर्व व्यावसायिक आस्थापनांचे दोन भागांत वर्गीकरण करण्यात आले आहे. पी 1 या श्रेणीतील दुकाने विषम, तर पी 2 या श्रेणीतील दुकाने सम तारखांना उघडता येणार आहेत. रस्ता पूर्व-पश्चिम असल्यास दक्षिण बाजूंकडील दुकाने सम तर उत्तर बाजूकडील दुकाने विषम तारखेला उघडतील. रस्ता दक्षिण-उत्तर असल्यास पूर्व बाजूकडे दुकानासमोर पश्चिम बाजूकडील दुकाने विषय तारखेला उघडतील. बंद असलेल्या दुकानांसमोर ग्राहकांना त्यांची वाहने पार्क करता येणार आहेत. सकाळी 9 ते सायंकाळी पाचपर्यंत दुकाने सुरू ठेवता येणार असून कोरोना पार्श्वभूमीवर लागू असलेल्या सर्व नियमांचे पालन दुकानदार व ग्राहकांना करणे अनिवार्य करण्यात आले आहे. सोशल डिस्टन्स राहावे, याकरिता दुकानदारांना व्यवस्था करायची असून ग्राहकांनी त्यांचे मास्क लावण्याचीही जबाबदारी दुकानदारांवर आहे.कापड दुकानांत ट्रायल रूम वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. कपड्यांची अदलाबदल करण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. थर्मल स्कॅनिंग, हॅंड वॉश व सॅनिटायझरची व्यवस्था दुकानदाराने करणे अनिवार्य आहे. शहरातील ही दुकाने 5 जून ते 30 जूनपर्यंत सम-विषम पद्धतीने चालू राहणार आहेत. शहरातील प्रतिबंधित व बफर झोनसह दाट वसाहतीच्या ठिकाणच्या बाजारपेठा मात्र बंद राहणार आहेत.

  • सकाळी 9:00 ते 5:00 उघडण्याबाबत झाले आदेश,
  •  कधी आणि कोणते दुकाने सुरू होणार सविस्तर आदेश जसाच्या तसा पहा

कार्यालयीन आदेश 

विषय :- कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रासाठी सुधारीत आदेश -मिशन बिगोन अगेन.

१. कोविड -१९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांकरीता सुधारीत एकत्रीत मार्गदर्शक सूचना आदेश क्र.DMU/२०२०/CR.९२/DISM-१ दि.३१.०५.२०२०.

२. अधिसूचना सार्वजनिक आरोग्य विभाग,मुंबई,क्र.करोना२०२० प्र.क्र.५८/आरोग्य५ दि.१४ मार्च २०२० ३. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ ४.भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७, ५.मा.जिल्हाधिकारी यांचेकडील आदेशक्र.दंडप्र०१/कावि/२०२०/२६५ दि.३१ मे २०२०

संदर्भ : ज्याअर्थी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मदत व पुनर्वसन विभाग मंत्रालय ३१ मे २०२० मुंबई-४०००३२ यांचे आदेश क्र.No.dmu/२०२०/cr.९२/DISM-१ दिनांक अन्वेय कोरोना विषयक उपाययोजना संदर्भात लॉकडाऊन टप्याटप्याने उठविणे आणि या कालावधीत प्रतिबंधने कमी करण्याबाबतच्या सुधारीत आहेत. मार्गदर्शक सूचना निर्गत केल्या ज्याअर्थी मा.जिल्हाधिकारी जळगांव यांनी संदर्भ क्रमाक ५ मधील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी घ्यावयाची दक्षता बाबत आदेश निर्गमीत केलेल आहेत. त्या अनुषंगाने मी सतीश कुलकर्णी, आयुक्त, जळगांव शहर महानगरपालिका, जळगांव मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये खालीलप्रमाणे सुधारीत आदेश निर्गत करीत आहे. यामधील फेज-२ (टप्पा -२) ५ जून २००५ पासून सुरु होत असून जळगांव महानगरपालिका हद्दीतील मार्केट,मार्केट परिसरातील दुकाने याबाबत खालील प्रमाणे आदेश देणेत येत आहे.

मार्केट व मार्केट परिसर व दुकाने (मॉल्स व बाजार संकुले ()- Malls & Market complex वगळून । ही (आळीपाळीने) P१-P२ पध्दतीने रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सम दिनांकाच्या दिवशी व दुसऱ्या बाजूची दुकाने विषम दिनांकाच्या दिवशी पुढील नियमाप्रमाणे उघडतील रस्ता,पूर्व पश्चिम असल्यास दक्षिण बाजूकडील दुकाने सम दिनांकास तर उत्तर बाजूकडील दुकाने विषम दिनांकास आणि रस्ता दक्षिण -उत्तर असल्यास रस्त्यांच्या पूर्व बाजूकडील दुकाने सम दिनांकास तर पश्चिम बाजूकडील दुकाने विषम दिनांकास उघडी राहतील.

वर नमूद केलेली दुकाने ही सकाळी ०९.०० ते सायंकाळी ०५.०० याकालावधीत खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून सुरु राहतील.

१. कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रुम (trial room) दुकानदारांनी सुरु ठेवू नय तसेच exchange policy & return policy

२. Social distancing चे नियम पाळण्याची संपूर्ण जबाबदारी दुकानदारांची राहील तसेच ग्राहकांसाठी foot marking.token system,home delivery इ.बाबी उपलब्ध करुन घ्याव्यात.

३. नागरीकांनी शक्यता जवळच्या दुकानांत मार्केटचा वापर करावा आणि दुकानांत खरेदीसाठी पायी जावे अथवा सायकलचा वापर करावा.

४. नागरीकांन अत्यावश्यक वस्तू वगळता इतर वस्तू घेण्यासाठी दूर अंतरावरील मार्केटमध्ये जाण्यावर बंदी आहे.

५. मार्केटमधून वस्तू खरेदीसाठी motorized vehicle वापरू नये,

वरील प्रमाणे नियमांचे उल्लंघन झाल्यास तात्काळ दुकाने/ मार्केट बंद करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बाजार संकुले व त्यातील दुकाने (मनपा मालकीची, शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी) पूर्णपणे बंद रहातील मात्र यापूर्वीच्या आदेश प्रमाणे वरील ठिकाणची तसेच शहरातील अन्य ठिकाणी अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु राहतील. अन्य बाबीसंदर्भात मा.जिल्हाधिकारी जळगांव यांचेकडील संदर्भ क्रमांक ५ मधील आदेश दि.३१/०५/२०२० मधील सूचना लागू रहातील.

  • तब्बल 74 दिवसानंतर उघडणार जळगावातील दुकाने
  • – अटी-शर्ती वर दुकाने उघडण्यास परवानगी
  • -व्यापारी संकुलांना परवानगी नाही तर खासगी कार्यालयांना परवानगी
  • – मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांची परवानगी
  • – नियमांचे उल्लंघन झाल्यास तात्काळ कारवाई

 

Leave A Reply

Your email address will not be published.