जळगांव दि २९ – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची गुरुवार दि ३० रोजी पुण्यतिथी निमित्ताने राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने शहरातील काँग्रेस भवनात दुपारी १ वा.
एकता संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एकता संमेलनात सर्व धर्माचे धर्मगुरू ( हिंदू, बौद्ध, जैन, मुस्लिम, ख्रिश्चन, शिख ) प्रार्थना व मार्गदर्शन करणार आहेत तरी या एकता संमेलनात आजी माजी आमदार,खासदार,सर्व ब्लॉक अध्यक्ष, तालुक्याचे प्रभारी पदाधिकारी यांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष ऍड संदीप पाटील यांनी केले आहे.