– आमदार किशोर पाटील यांचे प्रयत्नास यश

पाचोरा ✒ प्रतिनीधी
जळगांव – मनमाड तिसऱ्या तिसऱ्या लाईनसाठी परधाडे, बाळद बु”, दुसखेडा, नाचणखेडा, व वडगांव खु” येथील ५२ शेतकऱ्यांची २.४७ हेक्टर जमीन संपादीत करण्यात येणार असून या जमिनीचा मोबदला म्हणून हेक्टरी ३१ ते ४१ हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार होती. ही रक्कम अतिशय कमी असल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या जमीनीचा भरीव मोबदला मिळावा यासाठी आमदार किशोर पाटील यांनी दि. १३ रोजी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांचे कार्यालयात तातडीची बैठक आयोजित करून शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ८५ हजार रुपये मोबदला मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांनी तातडीने प्रस्ताव तयार करून तो जिल्हा अधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे अस्वासन दिले आहे. यावेळी नायब तहसीलदार रमेश राजगुरु, अव्वल कारकून अभिजीत येवले, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील, पप्पू राजपूत आमदार किशोर पाटील यांचे स्वीय सहाय्यक राजेश पाटील, शेतकरी अशोक पाटील, सुभाष पाटील, काशिनाथ पाटील, निलेश राठोड, योगेश महाजन, हिंमत पाटील, शांताराम पाटील, हिलाल पाटील, कौतिक पाटील, पद्माकर पाटील, रामकृष्ण पाटील, मच्छीद्र पाटील उपस्थित होते.

