जलाल शेठ व त्यांची मातोश्री जमशादबी यांचे एकाच दिवशी निधन : कासोदयात शोककळा

0

कासोदा ता,एरंडोल | प्रतिनिधी

येथील माजी उपसरपंच जलाल शेठ व त्यांच्या मातोश्री जमशादबी या मातापुत्राचे दिनांक १३ मार्च रोजी एकाच दिवशी दुःखद निधन झाले.जलालशेठ भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष होते.समाजसेवेसह एक मुरब्बी राजकारणी,अजातशत्रू तथा गरीबांचे मसिहा,दीनदलितांचे कैवारी,लोकप्रिय नेता म्हणून त्यांचा जिल्ह्यात लावलौकीक होता.अल्पशा आजाराने ६० व्या वर्षी त्यांचे निधन झाले.त्यांच्या वयोवृद्ध मातोश्री ( वय ८५ ) जमशादबी यांच्या कानावर लाडक्या मुलाची निधन वार्ता पडताच असहय वियोगातच शोकमग्न भावविव्हल मातेने क्षणार्धात जगाचा निरोप घेतला.एकाच दिवशी दोघांच्या आकस्मिक निधनाने कुटूंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला . पुत्र वियोगाच्या धक्क्याने मातेचे निधन ही वार्ता परिसरात पसरताच सारा गाव हळहळला.आप्तेष्ट आणि मित्र मंडळींनी अंतदर्शनासाठी धाव घेत साश्रुनयनाने निरोप दिला.माता जमशादबी  या शरीराने पैगंबरवासी झाल्या परंतू त्या अजोड पुत्रप्रेमाने प्रत्येक कासोदावासियांच्या मनात अमर राहतील.

Leave A Reply

Your email address will not be published.