जलसंपदा मंत्री जयंत पाटील याचे हंबर्डी ग्रामस्थाकडून स्वागत

0

यावल (प्रतिनीधी) हंबर्डी  ता. यावल. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने  प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष अँड. रवींद्र भैय्या  पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे चोपडा येथून फैजपूर येथे जात असतांना सामाजिक कार्यकर्ते खेमचंद पाटील , तुषार पाटील, अक्षय वाघुळदे , जितेंद्र पाटील यांच्या सह नवनिर्वाचित ग्रामपंचायात सदस्य रुपेश महाजन, उषा पाटील, अलका पाटील, यांच्या सह ग्रामस्थांनी  आपले हंबर्डी गावं पुस्तक व पुष्प गुच्छ देऊन बस स्टॅन्ड वर स्वागत केले.

गावाचा इतिहास दर्शवित असलेले आपले हंबर्डी गाव  पुस्तक लोक, लोकजीवन, धार्मिक, सामाजिक,  रीतिरिवाज, आर्थिक स्थिती स्वतंत्र चळवळीतील सहभाग, शिक्षण क्षेत्रात असलेली प्रगती यासह अन्य विषयांची माहिती सुंदर मांडण्याचा प्रयत्न समाविष्ठ केलेले पुस्तक भेट दिले .  श्री खेमचंद पाटील यांनी हंबर्डी गावाचे गयझेटिअर तयार केले आहे  हंबर्डीकर बेकरी ची आठवण काढून हेच का ते गाव बोलून तेथे उपस्थित  सर्वामध्ये हास्य पिक वला.

Leave A Reply

Your email address will not be published.