जलसंकट : हतनुर धरणाचा पाणीसाठा शुन्य

0

मे अखेर पाणी संकट होणार गडद

वरणगाव :- हतनूर धरणातील पाणीसाठा संपल्याने पाणीपुरवठा यंत्रणेसह औद्योगावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता बळावली आहे. मे महिन्याच्या शेवटी पाण्याचे संकट गडद होण्याची चिन्ह दिसत आहे. जिल्हातील महत्वाच्या प्रकल्पापैकी भुसावळ तालूक्यातील हतनूर धरणाचा जिंवत पाणीसाठा संपुष्टात आल्याने मलकापूर एमआयडीसी सह पाणीपुरवठा यंत्रणा तर जिल्हयातील पाणि पुरवठा यंत्रणेसह औद्योगावर जलसंकटाचे ठग गळद होत आहे.

पावसाळ्याला विलंब झाल्यास हतनूर प्रकल्पावरिल  अवलंबून असलेल्या औद्योगासह पाणि पुरवठा यंत्रणा ठप्प पडण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

या आधि अशी गंभीर परिस्थिती १९९२ तसेच २०१३-१४ ला निर्माण झाली होती. तशीच परिस्थिती या वर्षीहि निर्माण  झाली ती निर्सगाच्या लहर पणामुळे पावसाळा दरवर्षी कमी प्रमाणात होत असल्याने अशी परिस्थिती उव्दभवत आहे. मागील पावसाळ्याचे प्रमाण अल्प राहिल्याने त्याचा परिणाम धरणाच्या जलसाठ्यावर झाला तसेच उष्णता मान अधिक  असल्याने बाष्पीभवनाचा वेगहि  जास्त राहिला. तसेच पाणि  चोरीचा प्रकार वाढल्याने त्याचा परिणाम जलसाठयावर झाला आहे जलसंपदा विभागाने चोरीवर वेळीच आळा घातला असता तर परिस्थितीत बदल दिसुन आला असता असा सुर जन माणसातून व्यक्त केला जात आहे.

जलसंकटा करीता गाळ महत्वाची डोके दुखी ठरली.

हतनूर धरणाच्या उभारणी पासुन धरणात गाळ  साठल्याने गाळाने धरणातील पाण्याची जागा व्यापल्याने साहजिकच धरणातील प्रत्यक्ष जलसाठा कमी झाला आहे. मेरिने काहि महिन्या पुर्वी केलेल्या सर्व क्षणात धरणात ५४ टक्के गाळ साचल्याचा अहवाल दिला असल्याने धरणातील जलसाठा निम्म्मावर आला आहे

जलसंपदा विभाची अनास्था

धरणात साठलेल्या गाळ उपसण्या करिता जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अनास्थे मुळे धरणातील गाळ काढण्याचे प्रयत्न केले गेलेच नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.