जलशुद्धीकरण केंद्र येथे ‘ऑटोमायझेन व्हॉल्व’ने पाणीपुरवठा होणार अधिक सुरळीत

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरातील डेराबर्डी स्थित परीसरातील जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी आज ‘ऑटोमायझेन व्हॉल्व’ बसविण्यात आला असून शहराचा पाणीपुरवठा अधिक सुरळीतपणे पार पडणार आहे. शहराला स्वच्छ व दर्जेदार पाणी मिळावे म्हणून तालुक्याचे माजी आमदार राजीव देशमुख यांच्या अथक प्रयत्नातून थेट गिरणा उद्भव क्षेत्रावरुन जलवाहीनी करण्यात आली होती. अत्याधुनिक स्वरुपातील व्हॉल्व बसविण्यात आल्याने नागरीकांना पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार नाही.

शहराला पाणीपुरवठा सुरळीत होण्याकामी नगरपरिषदेच्या वतीने आज जलशुद्धीकरण केंद्रात अत्याधुनिक स्वरुपात असलेला ‘ऑटोमायझेन व्हॉल्व्ह’ बसविण्यात आला असून शहरास होत असलेला पाणीपुरवठा अधिक सोयीचा झाला असून शहरातील जलकुंभ तात्काळ भरण्यात येणार असल्याचे दिनेश जाधव यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी प्रेमसिंग राजपूत, लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे आर जी पाटील, विलास जाधव, दिलीप पाटील, वाल्मिक सोनवणे, अमोल अहिरे, राजू जाधव, लखन पाटील, किरण म्हस्के आदी कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.