जलवाहिनी दुरुस्तीसाठी बोदवडकरांचे हिंगणाघाटीत आंदोलन

0

बोदवड | रस्त्याचे काम करताना एमएसआरडीसीकडून ओडीएची पाइपलाइन फुटूनही दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष पाहता बोदवडकरांच्या संतापाचा गुरुवारी उद्रेक झाला. अनेकांनी पाइपलाइन फुटलेल्या हिंगणाघाटी येथे धाव घेत आंदोलन केले. यामुळे घाबरगुंडी उडालेल्या ठेकेदार कंपनीच्या सल्लागार अभियंत्यांनी तातडीने गळती दुरुस्तीचे आणि पाइपलाइन शिफ्टिंग शिवाय रस्त्याचे उर्वरित काम न करण्याचा शब्द दिला.

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून रस्त्याचे काम सुरू असताना २८ मे रोजी रात्री ८ वाजता हिंगणा घाटीवर ओडीएची पाइपलाइन फुटली होती. ही गळती दुरुस्तीसाठी ४०० एमएमचा पाइपही उपलब्ध होत नव्हता. ही स्थिती पाहता बोदवड येथील संजय वराडे यांनी सोशल मीडियातून आंदोलनाची हाक दिली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गुरुवारी सकाळी १०.५० वाजता ५० पेक्षा जास्त बोदवडकर पाइपलाइन फुटलेल्या हिंगणा घाटी येथे एकत्र आले. त्यांनी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत घोषणाबाजीला सुरुवात केली. संजय वराडे, उपनगराध्यक्ष नितीन चव्हाण, गटनेता देवेंद्र खेवलकर, आनंदा पाटील, विजय पालवे, अनंता वाघ, शांताराम कोळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.