जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी शहराचा पाणी पुरवठा १ दिवस पुढे !

0

जळगाव | प्रतिनिधी

येथील शिरसोली नाका ते काव्यरत्नावली चौकातील पाईपलाईनवर गळती दुरुस्तीचे काम आजपासून सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे पाणी पुरवठा एक दिवस पुढे असून नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.वाघुर पाणी पुरवठा योजने अंतर्गत शहरास पाणी पुरवठा करणेचे कामी शिरसोली नाका ते काव्यरत्नावली चौक वरील १२०० मिमि व्यासाची पी.एस.सी. पाईपलाईनवर गळती दुरुस्तीचे काम व वापर सब स्टेशनमधील काम दि.२ ऑक्टोंबर रोजी सुरु केले आहे. याकरिता शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. दि.०३ ऑक्टोंबर रोजी पाणी पुरवठा दि.०४ ऑक्टोंबर रोजी करण्यात येईल. तसेच दि.४ ऑक्टोंबररोजी व दि ५ ऑक्टोंबररोजीचा पाणी पुरवठा अनुक्रमे दि ५ऑक्टोंबर व ६ ऑक्टोंबर रोजी करण्यात येणार आहे. नागरीकरांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावे व महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने कळविले. दरम्यान, मेहरुण, अयोध्दानग मधील परिसर तसेच खेडी योगेश्वरी परिसराचा पाणी पुरवठा नियमितपणे ३ ऑक्टोंबरला होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.