जलयुक्त शिवाराची चौकशीची फडणविसांच्या मागणीवरूनच ; खडसे

0

जळगाव प्रतिनिधी । माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. यामुळे फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता दिसून येत आहे. दरम्यान, ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर आता भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याची मागणी फडणवीस यांनीच केली असल्याने या अनुषंगाने चौकशी होणार असल्याचा दावा खडसे यांनी केला आहे.

जलयुक्त शिवार योजनेवर फडणवीस सरकारने 9 हजार 634 कोटी रुपये खर्च केले होते. मात्र, एवढा पैसा खर्च करूनही पाण्याची गरज भागवण्यास आणि भूजल पातळी वाढवण्यास अपयश आल्याचे कॅगने अहवालात म्हटले होते. या योजनेतील घोटाळ्याची चौकशी एसआयटीमार्फत करण्याचा निर्णय  राज्य सरकारने घेतला आहे, या पार्श्‍वभूमिवर, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना विचारले असता ते म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेत अनेक प्रकारच्या त्रुटी असून याची चौकशी करावी अशी मागणी खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या अनुषंगाने राज्य सरकारने याची चौकशी लावलेली आहे. यातून खरंच ही योजना यशस्वी झाली की नाही याची माहिती समोर येईलच असे प्रतिपादन एकनाथराव खडसे यांनी याप्रसंगी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.