Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
जळगाव :
जलजागृती सप्ताहानिमित्ताने २२ मार्च रोजी सकाळी ७ वाजता काव्यरत्नावली चौक ते शिवतीर्थ मैदान दरम्यान वॉटर रनचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वाघूर धरण विभागाचे कार्यकारी अभियंता सु. फ. गावीत यांनी दिली आहे.शासनाचा जलसंपदा विभाग व तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव यांच्यामार्फत १६ ते २२ मार्च २०१८ या कालावधीत जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहाचा एक भाग म्हणून वॉटर रन चे आयोजन करण्यात आले आहे.
या वाटॅर रनमध्ये सहभागी होणाऱ्यांना विभागाच्यावतीने प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन कार्यकारी अभियंता श्री. गावीत यांनी केले आहे.