Sunday, May 29, 2022

जय किसानच्या संचालकांचे कृउबासमधील परवाने रद्द होणार!

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

 

- Advertisement -

गणेश भेरडे, खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

नाफेडचा चोरीचा हरभरा खरेदी करणाऱ्या जय किसान खासगी कृषि उत्पन्न बाजार समिती संचालकांना पोलीसांनी अभय दिले असले तरी या संचालकांच्या स्थानिक कृउबास मधील फर्मचे आतापर्यंत कृपलाणी यांच्या कृपेने गैरकायदेशीरपणे सुरू असलेले परवाने रद्द होणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर याबाबीला कृउबासचे सचिव मुकुटराव भिसे यांनी दुजोरा दिला आहे.

शहरालगतच्या वरखेड खुर्द शिवारातील महाराष्ट्र वखार महामंडळाच्या गोदामामधून 1 ते 2 डिसेंबर 2021 च्या दरम्यान नाफेडचा सुमारे 5 लाखाचा 175 कट्टे (87 क्विंटल 50 किलो) हरभरा चोरीला गेला होता. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी तपासा दरम्यान 4 जानेवारीला विठ्ठल मेहंगे व विशाल भटकर रा. शेगाव या दोन आरोपींना अटक केली. सोबतच चोरी गेलेला माल, गुन्ह्यात वापरलेले वाहन टाटा 709 व मोबाईल असा एकुण 11 लाख 54 हजार 875 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना न्यायालयाकडून पीसीआर व नंतर एमसीआर मिळाला आहे. मात्र या प्रकरणात चोरीचा माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना पोलीसांनी अभय दिल्यानंतर वेगवेगळ्या चर्चेला उत आला होता. या प्रकरणातील आरोपी विठ्ठल मेहंगे याने मागील वर्षीसुद्धा या बाजार समितीला शेतमाल विकल्याची चर्चा होत होती. मात्र पोलिस तपास भरकटवल्याने सर्व काही आलबेल झाले आहे. तर जयकिसान बाजार समितीच्या निलकमल ट्रेडर्स, राजमाता ट्रेडर्स, रवि इंडस्ट्रीज व शिया एन्टरप्राईज या 4 फर्मच्या संचालकांचे स्थानिक कृषि उत्पन्न बाजार समितीचे सुध्दा परवाने असून त्यांनी ते दुसऱ्यांना भाड्याने दिले असल्याची माहिती समोर आली आहे. तर हे परवाने गैरकायदेशीर असल्याचेही बोलले जात आहे. यासंदर्भात प्रस्तुत प्रतिनिधिने स्थानिक कृउबासचे सचिव भिसे यांना विचारणा केली असता त्यांनीही दुजोरा दिला असून पुढील महिन्यात त्यांच्या परवान्याच्या नुतकरणाची वेळ आहे. मात्र ते नुतनीकरण न करता रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र यानंतरही कृपलानीची कृपा झाली तर सांगता येत नाही.

तपास अधिकाऱ्याच्या चौकशीची गरज!

एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविता येणारी मालमत्ता म्हणजे जंगम मालमत्ता. लूटमार’ व ‘दरोडेखोरी’ हे जंगम मालमत्तेसंबंधीचे गंभीर तसेच दंडनीय व संघटीत गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे असून भारतीय दंड संहितेत अशा गुन्ह्यांचे घटक व त्याबाबत प्रतिबंधात्मक व दंडात्मक अशा कायदेशीर उपाययोजनांची तरतूद केलेली आहे. (कलम 390 ते 402). लूटमारीच्या गुन्ह्यामध्ये मुख्यतः चोरी (थेफ्ट) व बलाद्ग्रहण (इक्स्टॉर्शन) या घटकांचा समावेश असतो. दरोडेखोरी झाल्यानंतर अल्पावधीतच चोरीचा माल जर कोणा एखाद्या इसमाकडे सापडला, तर तो  दरोडेखोरांपैकीच एक आहे, असे कायद्याने अनुमान काढता येते. असेही एका प्रख्यात विधितज्ञांनी सांगितले. त्यामुळे आता तपास अधिकाऱ्याचीच चौकशी करण्याची गरज निर्माण झाल्याचे दिसून येते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या