श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या राष्ट्रीय महामार्गावर दहशतवादी आणि पोलीस दलांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले असून यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. दरम्यान, आज पहाटेपासून सुरू झालेली ही चकमक अजूनही सुरूच आहे.
श्रीनगर महामार्गावरील बान टोल प्लाझा येथे लष्करी जवानांना एक संशयित ट्रक दिसला. तो अडवल्यानंतर ट्रकमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारात एक भारतीय जवान जखमी झाला. या चकमकीत भारतीय जवानांना एकूण ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले. तर एक जवान जखमी झाला आहे.
J&K Police: Police intercepted a Srinagar bound truck at Bann toll plaza on Jammu-Srinagar highway. Truck bound terrorists fired on police triggering an encounter. One policeman injured, one terrorist killed. (deferred visuals) pic.twitter.com/TYVDWACGi8
— ANI (@ANI) January 31, 2020
विशेष म्हणजे भारतीय जवानांना चकमा देण्यासाठी या दहशतवाद्यांनी लष्करी गणवेश परिधान केला होता. ही चकमक सुरू असताना, भारतीय लष्कराने परिसराची नाकेबंदी केली असून परिसरात शोध मोहीम हाती घेतली आहे