नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील मेंधार सेक्टर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा रक्षकांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय लष्कराच्या सुत्रांच्या हवाल्याने एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.
लष्कराच्या माहितीनुसार, 9 फेब्रुवारी रोजी मेंधार सेक्टरमध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबाराला आपल्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, मेंधार सेक्टर येथे पाकिस्तानी रेंजर्सकडून शस्त्रसंधीचे उल्लंघनही करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी विविध ठिकाणी पाकिस्तानकडून अशा प्रकारे शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. त्यावेळी भारतीय जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.