जम्मू-काश्मीरात लष्कराची मोठी कारवाई, चकमकीत ९ दहशतवादी ठार

0

श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात आज रविवारी भारतीय लष्कर आणि दहशवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत ९  दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आल आहे.  कुपवाड्यातील केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेनजिक ही कारवाई करण्यात आली आली. दरम्यान, या कारवाईत एक जवान शहीद झाला असून इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.एएनआयनं लष्कराच्या सुत्रांच्या हवाल्यानं याबाबत ट्विट केलं आहे. या भागात जोरदार बर्फवृष्टी होत असल्याने जखमी जवानांचा बचाव करण्याच्या कामात मोठे अडथळे येत आहेत.

दहशतवाद्यांविरोधातील या कारवाईबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर काश्मीरमधील कुपवाडा येथे लष्कराने केलेल्या कारवाईत ५ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले, तर २४ तासांमध्ये एकूण ९ दहशतवादी ठार झाले आहेत. यांपैकी ४ दहशतवादी काल कुलगाम येथे मारले गेले होते.

बर्फवृष्टीचा फायदा घेत करत होते घुसखोरी

कुपवाडा येथे सुरू असलेल्या चकमकीचा आजचा पाचवा दिवस आहे. बुधवारी पाकिस्तानी दहशतवादी नियंत्रण रेषा पार करत भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होते. खराब हवामान आणि जोरदार बर्फवृष्टीचा फायदा घेत हे दहशतवादी भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होते. हे दहशतवादी नियंत्रण रेषा पार करण्यातही यशस्वी झाले. बुधवारी दुपारीच भारतीय जवानांनी या दहशतवाद्यांना घेरले होते. त्यावेळी चकमक देखील झाली, मात्र, बर्फवृष्टी, दाट धुके आणि पावसाचा फायदा घेत हे दहशतवादी घेराव तोडून पळाले. त्यानंतर लष्कराने संपूर्ण भागाला घेरून शोधमोहीम हाती घेतली.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.