श्रीनगर: जम्मू काश्मीरमध्ये बसला भीषण अपघात झाला आहे. त्यात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 7 जण जखमी झाले आहेत. सध्या घटनास्थळी प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे. बस केशवानहून किश्तवाडला जात असताना हा अपघात झाला. यामध्ये जखमी झालेल्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
#UPDATE Deputy Commissioner of Kishtwar, Angrez Singh Rana: 33 dead and 22 injured after a matador vehicle coming from Keshwan to Kishtwar fell into a gorge, today. #JammuAndKashmir pic.twitter.com/fki3XzNQhU
— ANI (@ANI) 1 July 2019
केशवानहून किश्तवाडला जाणाऱ्या बसला सिरग्वारीमध्ये अपघात झाला. बस रस्त्यावरुन घसरल्यानं झालेल्या या अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी पावणे आठच्या सुमारास हा अपघात झाला. बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यानं ही दुर्घटना घडल्याचं स्थानिकांनी सांगितलं.