जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण

0

कोल्हापूर : जम्मू काश्मीरच्या राजुरीमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण आलं आहे. कोल्हापुरातील महागावचे जवान जोतिबा गणपती चौगले शहीद झाले आहेत. यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

चौगले मूळचे गडहिंग्लज तालुक्यातील महागाव गावचे होते. 2009 साली चौगले सैन्यदलात दाखल झाले होते. जम्मूमध्ये राजुरी येथे अतिरेक्यांची झालेल्या चकमकीत चौगले यांना वीरमरण आले. दरम्यान, मंगळवारी दुपारी महागावत चौगले यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.