श्रीनगर – लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास उरलेले असतानाच जम्मू-काश्मीरस्थित पूंछमध्ये एका आयईडी स्फोटात एका जवान शहीद झाला आहे. तर सात जण जखमी झाले आहेत. सुरक्षा दलाने या परिसराला घेरले असून शोधमोहीम हातात घेतली आहे.
पूंछ जिल्ह्यामधील मेंढर येथे सुरक्षा दलाचे जवान नियमित गस्तीवर होते. यावेळी आयईडी स्फोट करण्यात आला. यामध्ये एक जवान शहीद तर सात जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, दक्षिण काश्मीरमधील बडग्राम जिल्ह्यातील चाडूरा जवळ मंगळवारी रात्री झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.