भुसावळ (प्रतिनिधी)- लॉकडाऊनमुळे श्रमिक , हातमजुरी व घरकाम करणाऱ्या महिलांना घरमालकांनी जबरदस्ती घर भाडे मागितल्यास तक्रार करून आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी ट्रेड युनियन काँग्रेसचे अरुण दामोदरे यांनी दिला असून याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
भुसावळ परिसरातील अनेक भागात अनेक श्रमिक हातावर काम करणारे कामगार तसेच घर काम करणाऱ्या महिला भाड्याने घर घेऊन राहत आहेत. परंतु लॉकडाऊन झाल्यापासुन या कामगारांची अनेक प्रकारे हाल अपेष्टा होत आहे. गेल्या तीन महिन्यापासुन कोणतेही काम नसल्याने आर्थिक व इतर अडचणीला सामोरे जावे लागत आहे. यात महत्त्वाचे म्हणजे अनेकांनी घरभाड्याने घेतलेले आहे. बाहेर काम नाही घरमालक घर भाडे दिले नाही तर घर खाली करण्यास जबरदस्ती करीत आहे. यासर्व प्रकारामुळे घर भाड्याने घेऊन राहणाऱ्या कामगारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. याबाबत शासनाने संबंधीत घरमालकाला घरभाडे मागु नये असा आदेश काढला असला तरी त्याचा काहीही परिणाम झाल्याचे दिसत नाही. या परिसरात अनेक घरमालक संबंधीतांना वेगवेगळ्या पध्दतीने घर खाली करण्यासाठी त्रास देत असल्याच्या तक्रारी असून या प्रश्नाकडे जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष द्यावे याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी ट्रेड युनियन काँग्रेसने जिल्हाधिकारी यांना नुकतेच निवेदन दिले असून याबाबत जिल्हाधिकारी साहेब कोणती भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे . यावर शासनाने तातडीने कारवाई न केल्यास घरमालकां विरुध्द रितसर तक्रारी करुन आंदोलनाची भुमिका घेणार असल्याचा इशारा ही दिला आहे . घरमालकांनी सद्यस्थितीची जाणीव ठेवुन मानविय दृष्टीकोनातुन भाडेकरूंना काही दिवस सुट देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post