जनावरांची अवैध वाहतूक करणारा कंटेनर पकडला; एकाला अटक

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भुसावळ तालुक्यातील काहूरखेडा शिवारात कंटेनर अपघातग्रस्त झाल्यामुळे काहूरखेडा शिवारातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली असता या कंटेनरमध्ये गोवंश जातीच्या जनावरांची अवैध वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. एकाला अटक करण्यात आली असून वरणगाव पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

सदर  कंटेनरमध्ये १५ ते २० जनावरे होती, त्यापैकी पाच ते सहा जनावरांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आज सकाळी आठ वाजेच्या  सुमारास मध्यप्रदेश मधून मालेगावकडे गोवंश जातीच्या १५ ते २० जनावराला घेऊन जाणारा कंटेनर (डीएन ०१ डीबी ७०९८) हा काहूरखेडा शिवारामध्ये अपघात ग्रस्त झाला स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी वरणगाव पोलिसांना तात्काळ माहिती दिली.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत एका आरोपीस ताब्यात घेतले आहे.  सदर गोवंशाची जातीच्या जनावरांना जळगाव येथे गोशाळेमध्ये पाठवण्यात आले आहे.  यामध्ये ४ ते ५ जनावरांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. सदर घटनेचा पुढील तपास वरणगाव पोलिस स्टेशनचे कर्मचारी करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.