लासुर ता.चोपडा(वार्ताहर)-परिसरातील कर्जाणे येथे नुकतेच जनसेवा फाउंडेशन यांच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.आपण या समाजाचे काही देणं लागतो या भावनेतून जनसेवा फाउंडेशनच्या वतीने वेळोवेळी असे समजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
याप्रसंगी जनसेवा फाउंडेशन चे सचिन पाटील,घनश्याम माळी (चोपडा),अशोक कोळी,गजानन कोळी,देविदास पाटील,दिगंबर कोळी,सचिन खैरनार,अविनाश पाटील, युवराज खैरनार,विवेक पाटील,आबा कोळी,संदीप पाटील, भरत खैरनार,मनोहर कोळी आदी सदस्य उपस्थित होते.