निंभोरा,ता.रावेर– महाराष्ट्र राज्य जनसंग्राम बहुजन लोकमंचच्या वतीने इयत्ता १० वीच्या माध्यमिक शालांत परीक्षांत यशवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव व परिसरातील गरीब-होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.येत्या मंगळवारी २६ जून रोजी सकाळी ११ वाजता येथील रेणुकादेवी शिक्षण प्रसारक संस्थेच्या सौ. डी.आर.चौधरी माध्यमिक विद्यालयात हा कार्यक्रम होईल.
निंभोरा माध्यमिक शालांत परीक्षेच्या बोर्डाला संलग्न असलेल्या शाळांतील प्रथम व द्वितीय ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार जि.प.चे माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांच्या हस्ते तर वह्या वाटप जि.प.चे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या हस्ते करण्यात येईल.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरीषदादा चौधरी राहणार आहेत.
यांची असेल विशेष उपस्थिती-
कार्यक्रमाला पं.स. सदस्य दीपक पाटील,बीडीओ हबीब एन.तडवी, गटशिक्षणाधिकारी विजय पवार, जनसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष व माजी उपसरपंच विवेक ठाकरे,रेणुकादेवी शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ईश्वरशेठ चौधरी,सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष रोहिदासशेठ ढाके, संस्थेचे चेअरमन ज्ञानदेव नेमाडे, न्यु.इंग्लिश स्कुलचे चेअरमन प्रल्हादभाऊ बोंडे,मधुकर साखर कारखान्याचे माजी संचालक चत्रभूज खाचणे,कृउबाचे माजी उपाध्यक्ष दुर्गादासभाऊ पाटील,माजी सरपंच अमानशेठ पठाण,ग्रा.पं.सदस्य रमेश येवले,मुजाहिद्दीन शेख,दस्तगीर (बबलू) पटेल,नामदेव खंडू ढाके पतसंस्थेचे चेअरमन सुधाकर पुना भंगाळे,नंदपाल दूध संस्थेचे चेअरमन रविंद्र नेहते,
न्यु.इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक ए.एच.वारके,डी.आर.चौधरी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सायराबी खान यांची विशेष उपस्थिती राहील.
निंभोरा बोर्डातून यशवंत ठरलेल्या यांचा होईल गौरव-
कार्यक्रमात निंभोरा बोर्डातून ९२.६० टक्के असे सारखे गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या अल्ताब युसूफ पटेल व कु.रक्षा अजय पाटील, ९२ टक्के मिळवून द्वितीय ठरलेल्या रितेश गोपाळ तायडे, त्याचप्रमाणे कु.रसिका वैभव पाटील (९१.६०),कु.अक्षदा ज्ञानेश्वर चौधरी (९०),रोहित विनय फुकटे (८९), कृष्णल राजेंद्र चौधरी (८८),चेतन अरुण बोरनारे (८७),कु.साक्षी विनोद चौधरी (८६.६०), लीना मिलिंद चौधरी (७८.४०),कु.पूनम विश्वनाथ कोळी (७३.७६),कु.शिवानी प्रकाश मेघे व ज्ञानेश्वर महेंद्र टोंगे (सारखे ७३ टक्के) या न्यु इंग्लिश स्कुल निंभोरा,उमेश्वर विद्यालय दसनुर,माध्यमिक विद्यालय पुरी-गोलवाडे, माध्यमिक विद्यालय तांदलवाडी, शा.प्र.राणे माध्यमिक विद्यालय खिर्डी व सौ.द्रौपदाबाई रामदास चौधरी माध्यमिक विद्यालय निंभोरा या शाळांतील यशवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी करण्यात येणार आहे.याशिवाय गरीब व होतकरू २०० विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप केल्या जातील.
उपस्थितीचे आवाहन-
यशवंतांच्या गौरव व वह्या वाटप कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन
जनसंग्राम बहुजन लोकमंच शालेय कार्यक्रम समितीचे प्रा.दिलीप सोनवणे, वाय.डी.पाटील,दिलशाद शेख सर,
दस्तगीर खाटीक,उत्तम बारी,नदीम शेख,राज खाटीक,शुभम बारनारे,हर्षल भारंबे,वैभव भिरूड यांनी केले आहे.