Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जनरेटर चोरी प्रकरणी मुख्य आरोपीसह साथीदार अटकेत
    गुन्हे वार्ता

    जनरेटर चोरी प्रकरणी मुख्य आरोपीसह साथीदार अटकेत

    Tushar BhambareBy Tushar BhambareNovember 21, 2020Updated:November 21, 2020No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा ;-सार्वे बु! येथील आदीवाशी शासकीय आश्रम शाळेतून जनरेटर चोरी प्रकरणी दाखल गुन्हात मुख्य संशयीत आरोपी सह साथीदार ला दि. २० नोव्हेंबर रोजी नगरदेवळा पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान मुख्य आरोपी कमलेश पाटील सह एका साथीदार ला पाचोरा येथील न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. या जनरेटर चोरी मागे अजून कोणाचा सहभाग आहे का ? यांचा पोलीस तपास करीत आहेत.
    याबाबत सविस्तर वृत्त असे की, सार्वे बु” ता. पाचोरा येथील शासकीय आदीवाशी शाळेतून दि. ३ नोव्हेंबर २०२० रोजी जनरेटर चोरीला गेले होते या प्रकरणी मुख्याध्यापक साहेबराव एरंडे यांच्या फिर्याद वरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला होता दरम्यान पोलिसांनी तापसचक्रे फिरवुन यात १ संशयित अशोक हिलाल आहिरे पिंप्री ता पाचोरा यास ताब्यात घेतले व त्याने सांगितले की, कमलेश पाटील नामक युवकाने मला हे कृत्य करण्यास सांगितले. त्यामुळे पोलीस कमलेश याच्या मागावर होते. आज दि. २० रोजी सकाळी मारुती व्हॅन घेऊन कमलेश नगरदेवळा गावाकडे येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली असता नगरदेवळा येथील सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर पाटील, विनोद पाटील, नरेश विसपुते, नरेंद्र शिंदे, मनोहर पाटील, त्यांनी त्यास मोठ्या शिफातीने अटक केली

    संशयीत मुख्य आरोपीचा शाळेत नेहमी वावर:
    सार्वे बु” ता. पाचोरा येथील आदीवाशी शाळेतून जनरेटर चोरी प्रकरण सुरुवातीला दडपण्याचा प्रयत्‍न झाला होता परंतु गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी या विषयी मुख्याध्यापक व वसतीगृह अधिक्षक यांना धारेवर धरले असता चोरी चा गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान या जनरेटर चोरी मागे अटक झालेला मुख्य आरोपी कमलेश पाटील यांचा शाळेत नेहमी वावर असल्याची बोलले जात आहे शाळेतील प्रमुख अधिकारी व अन्य कर्मचारी यांच्या शी घनिष्ठ संबंध तसेच शालेय कामकाज मध्ये हस्तक्षेप करीत असत यासाठी शाळेतील संबंधितांची मुख सहमती होती अशी चर्चा आहे त्यामुळे जनरेटर चोरी मागे अजून शाळेतील कोणा कर्मचारी चा सहभाग आहे का ? यांचा देखील पोलीसांनी तपास करावा अशी मागणी होत आहे.

    *त्या पञाचे कारण गुलदस्त्यात:शाळेतून जनरेटर चोरी झाल्याची घटना झाल्यानंतर मुख्याध्यापक यांनी पोलिसांत चोरी ची तक्रार दिली होती दरम्यान तपास चालू असताना वसतीगृह अधिक्षक यांनी जनरेटर सापडले असे पञ दिले होते परंतु मुख्याध्यापक यांनी ते सापडले नाही असे सांगीतले यामुळे जनरेटर चोरी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला हे उघड झाले आहे यामुळे अधिक्षक यांनी ते पञ पोलीसांना त्यामागचं कारण काय असा प्रश्न उपस्थित होत असून ते बाबत अजून शाळा प्रशासनाने माहीती दिली नाही त्यामुळे पञाचे कारण गुलदस्त्यात आहे याबाबत देखील पोलीसांनी तपास केला तर शाळेतील अनेक गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे.

    *एकलव्य संघटनेचे जिल्हा अध्यक्ष यांची शाळेस भेट..*
    सार्वे येथील आदीवासी आश्रम शाळेतील जनरेटर चोरी प्रकरणांत मुख्य आरोपीस अटक व्हावी, शाळेतील शौचालय ची दुरवस्था व नितकृष्ट कामाची चौकशी व्हावी यासाठी शाळेस भेट दिली असून लवकरच याविषयी संघटना आंदोलन करणार असल्याचे यावेळी सुधाकर वाघ यांनी सांगितले.

    *संशयित मुख्य आरोपी भाजप चा पदाधिकारी ?*
    सार्वे बु” पाचोरा आदीवाशी आश्रम शाळेतील जनरेटर चोरी प्रकरणी अटक झालेला आरोपी कमलेश पाटील हा भाजप युवा मोर्चा पक्षाचा माजी पदाधिकारी ? असल्याचे बोलले जात आहे यामुळे राजकिय क्षेत्रात या विषयी चर्चा होत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif