जनधान खात्यातील पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी ; नागरिकांकडून नियमांची पायमल्ली

0

भडगाव (प्रतिनिधी):- केंद्र सरकारने जनधानखात्यात 500 रुपये पाठवल्याने बँकेच्या ग्राहकांची एकच गर्दी आज दि 7 रोजी पाहायला मिळाली.

येथील भारतीय स्टेट बँक , बडोदा बँक , आय.डी.बी.आय. बँक 7-8 मिनी बँक सि.एस. सी केंद्रावर नागरिकांनी नियम धाब्यावर बसवून  नो डिस्टन्स ठेवत तोबा गर्दी केली .

सर्वत्र कोरोना आजाराची लागण होत असल्याने या आजराचा जगभरात आहाकार माजला आहे. अद्याप त्याच्यावर उपचार कामी संशोधन सुरू असल्याने सुरक्षिततेसाठी नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवून उभे राहण्याच्या प्रशासनाने सूचना दिल्या आहेत .मात्र येथील बँकामधून किरकोळ पैसे काढण्यासाठी नागरिकांनी सर्व नियम तोडून तोबा गर्दी केल्याचे पाहायला मिळाले . दरम्यान पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे , पो. ना. लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, राजेंद्र राठोड , हिरालाल पाटील, पोलीस पाटील भूषण पाटील आदींनी अचानक येथे येऊन लोकांना समज दिली. दरम्यान सकाळी हाथ गाडी वाले , अन्य लोकांची बँकेभोवती गर्दी झाली होती .

बँकांचे कुरियर बंद

कोरोना आजरामुळे स्टेट बँकेतील चेक वाटत नाही.  बँकेने कुरियर सेवा ठप्प असल्याचे कारण पुढे केल्याने,  येथील अनेक दिवसांपासूनचे चेक पडून आहेत,  त्यामुळे नागरिकांचे मोठया प्रमाणात व्यवहार ठप्प झाले आहे. चेक क्लीअर न होत असल्याने त्याला पर्याय न शोधता बँका दुर्लक्ष करत आहेत. बँकांच्या दुर्लक्ष पणा मुळे पैसे असतांनाही अनेक लोक व व्यावहार आर्थिक तंगीत सापडले आहेत. चेक अडकून पडलेल्या नागरिकांना पर्यायी व्यवस्था म्हणून बँकेने भारतीय पोस्ट ऑफीस मदत घेऊन नागरिकांना सेवा देणे गरजेचे आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.