पारोळा (प्रतिनिधी) : केंद्र शासनाने कोरोना सारख्या महाभयंकर आजारावर आळा बसवण्यासाठी संपूर्ण देश तसेच महाराष्ट्र लाँकडाऊन केला आहे. या काळात मोलमजुरी करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात अशा कुटुंबांसाठी शासनाने जनधन खात्यात तीन महिन्यासाठी प्रत्येक महिन्याला पाचशे रुपये याप्रमाणे दिले आहेत.
ते पैसे काढण्यासाठी बँकांन समोर सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी पहायला मिळत आहे. बँकांमध्ये गर्दी होत असल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मोठ्या प्रमाणात ग्राहक पाचशे रुपयासाठी आपला जीव धोक्यात घालून सर्वत्र बँकांत बाहेर गर्दी करत आहेत. यामुळे शासनाने जनधन खात्यातील पाचशे रुपये पोस्टात किंवा बँकेचे मिनी शाखा इथे मिळतील असे आव्हान केले आहे त्या अनुषंगाने पारोळा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया ग्रामपंचायत लोणी बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने जनधन खात्यावरील पैसे हे लोणी बुद्रुक येथील गावातच देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, यावेळी ग्रामस्थांनी बँकेचे आभार मानले