पहूर, ता.जामनेर (वार्ताहर) : येथे क्वारंटाईन सेंटरच्या अगदी समोरच असलेल्या मांस विक्री दुकानावर तसेच ‘जनता कर्फ्यू ‘ दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किराणा दुकानावर पहूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांनी बुधवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास धडक कारवाई करून रोख दंड वसुल केला.

जामनेर तालुक्यातील पहूर हे करूना संक्रमणाचे हॉटस्पॉट ठरले असून आतापर्यंत बाधितांची संख्या 57 झाली आहे.करुणा संक्रमणाची सामाजिक साखळी खंडित होण्यासाठी गावात 11 एप्रिल पासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. नुकतीच त्यात दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान नियमांचे उल्लंघन करत आर. टी लेले हायस्कूल या क्वारंटाईन सेंटरच्या अगदी समोरच उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या दुकानावर तसेच पोलिस स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या किराणा दुकानावरपहूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश सिंह परदेशी ,हवलदार शशी पाटील , पोलीस शिपाई श्री . धमुळ यांच्या पथकाने कारवाई केली .त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
