जगातील आठ श्रेष्ठ पर्यटनस्थळांमध्ये ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’चा समावेश

0

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या केवडिया स्थित ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’च्या पुतळ्याला जगातील आठ श्रेष्ठ पर्यटनस्थळांमध्ये स्थान मिळाले आहे. ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’चा जगातील आठ आश्चर्यांपैंकी एक आठ देशांची आंतरराष्ट्रीय संघटना असलेल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायजेशनने (SCO) घोषीत केल्याची ही माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.

एस. जयशंकर म्हणाले कि, ‘मला हे सांगताना खूप आनंद होत की, अद्वितीय प्रतिमा असलेल्या ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ला SCO च्या आठ आश्चर्यात सामिल करण्यात आले आहे. या सन्मानामुळे नक्कीच पर्यटक तिकडे अधिक आकर्षित होतील” असं ट्विट त्यांनी केलं आहे.

नर्मदा धरणापासून जवळ असेलला सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा अर्थात स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यात आला आहे. हा पुतळा जगात सर्वात उंच आहे. गेल्या वर्षी 31 ऑक्टोबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन झाले होते. सरदार पटेल यांचे हे भव्य शिल्प साकारण्यासाठी सुमारे 2 हजार 389 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीमुळं केवडिया हे गुजरातमधील छोटे शहर प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. हा पुतळा पाहण्यासाठी लाखो पर्यटक या ठिकाणी येत असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.