Monday, January 30, 2023

जखमी वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील वाल्मिक नगरमध्ये राहणाऱ्या ६० वर्षीय वृध्दाचा पायी जात असतांना खाली पडून डोक्याला दुखापत झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला असून   याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयत वृध्दाचे नाव  रामचंद्र जयराम सोनवणे (वय ६०, रा. वाल्मिक नगर, आसोदा रोड जळगाव) असे आहे. रामचंद्र सोनवणे हे आपल्या कुटुंबासह वाल्मिक नगरात वास्तव्याला आहे. १४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास दारूच्या नशेत पायी चालत असतांना त्यांचा तोल गेला व रोडवर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

- Advertisement -

त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना २० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अमोल विसपूते करीत आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे