भडगाव :- येथील सामाजिक कार्यकर्ते हाजी जाकीर कुरैशी यांना महाराष्ट्र संघातर्फे राज्यस्तरीय नवरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. वेल्हे (जि. पुणे) येथे *झालेल्या पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय १६ व्या अधिवेशनात त्यांना हा पुरस्कार वितरीत करण्यात आला.
कुरैशी गोवर इग्लिंश मीडीयम स्कूलचे चेअरमन तथा चोपडा धर्मादय हाॅस्पटचे उपाध्यक्ष हाजी जाकीर कुरैशी यांना महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने राज्यस्तरीय नवरत्न पुरस्कार जाहीर झाला होता. हिंदु-मुस्लिम एकोप्यासाठी प्रयत्न करत सामाजिक सलोखा राखणाचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांना नवरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. तोरणागडाच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे ( जि. पुणे) येथे पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय १६ व्या अधिवेशनात हा पुरस्कार त्यांना वितरीत करण्यात आला. पद्यमश्री खासदार विकास महात्मे , कृष्णा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे पाटील, आमदार रामहरी रूपनहर यांच्या हस्ते त्यांना सन्मानीत करण्यात आले.
यावेळी पत्रकार संघाचे राज्यध्यक्ष विलास कोळेकर, शेळी-मेढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, आमदार सग्राम थोपटे, माजी शिक्षण मंत्री अनंतराव थोपटे, पुणे जिल्हा बॕकचे संचालक रेवणाआण्णा दारवणकर, वेल्हे पंचायत समीतीचे उपसभापती दिनकर दरफळे, दुध उत्पादक संघाचे संचालक संभाजी पाटील, प्रशांत साळुखे, कवी संजीवन म्हात्रे, प्रहार संघटनेचे राहुल मानकर आदि उपस्थित होते. यावेळी राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखणीय काम करणार्या व्यक्तीचा ही गौरव करण्यात आला. अधिवेशनाला महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य कार्यकारीणी सदस्य सोमनाथ पाटील, उत्तर महाराष्ट्र सह संपर्क प्रमुख सुनील पाटील, तालुकाध्यक्ष अशोक परदेशी, जिल्हा कार्याध्यक्ष सुधाकर पाटील , माजी तालुकाध्यक्ष संजय पवार, सुनील कासार, तालुका उपाध्यक्ष जावेद शेख, राजु शेख आदि पत्रकार बांधव उपस्थित होते.