अमळनेर (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या १४ मे गुरुवार रोजी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असल्याने या दिवशी सर्व शिवशंभू प्रेमिनी घरातच संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून गोडधोड बनवून आनंद साजरा करावा व शिवशंभु चरणी देशातील तमाम रयतेचे कोरोना आजाराच्या संकटातुन सूटकेसाठी प्रार्थना करावी. तसेच संध्याकाळी ५ : ०० वा. अमळनेर येथील जेष्ठ इतिहास अभ्यासक प्रा.लिलाधर पाटील यांचे छत्रपती शिवाजी महाराज व युवराज संभाजी यांचे आग्रा लॉकडाऊन या विषयावर Online व्याख्यान Rajmudrafoundationamalner या फेसबुक पेजवर आयोजित करण्यात आले आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शिवशंभु प्रेमीनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष श्याम पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.