छोट्या पडद्यावर “श्री लक्ष्मीनारायण”ची अद्भूत महागाथा

0

मनोरंजन :

सध्या छोट्या पडद्यावर पौराणिक मालिकेचे पर्व सुरू झाल्याचे दिसते. अशा मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय. त्यातील नुकतीच सुरू झालेली मालिका “श्री लक्ष्मीनारायण”. अगदी पुराणापासून कलयुगापर्यंत माणूस लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी झगडत आहे, ती “लक्ष्मी” मात्र जिथे विष्णूचा वास असतो तिथेच निवास करते. अशा जगतजननी श्रीलक्ष्मी नारायणाची एकत्र येण्याची गोष्ट आणि अद्भूत महागाथा “श्री लक्ष्मीनारायण” प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

जिचा वर्ण सोन्यासारखा आहे, जी स्वत: आदिशक्ती आहे, जिच्या असण्यानेच सगळं शुभं होतं, जी सुख, ऐश्वर्य, धन यांचं प्रतीक आहे अशा श्री लक्ष्मीच्या प्राप्तीची आस आदी अनादी काळापासून मनुष्यालाच नाही तर देव – दानव, सूर – असूर यांना आहे. परंतु “लक्ष्मी” विना सृष्टीचे पालनहार नारायण मात्र अपूर्ण आहेत आणि ते एकत्र आले तर सृष्टीवर सुख नांदणार आहे, अशाच “श्री लक्ष्मी – नारायण” यांची अद्भुत महागाथा पहिल्यांदाच कलर्स मराठी वाहिनीवर २७ मे पासून संध्या ७ वाजेपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Embedded video

Colors Marathi

@ColorsMarathi

युगानयुगे साथ लाभलेले त्रिलोकाच्या संसाराचे सारथी #ShreeLakshmiNarayan यांचे शुभ आगमन,
27 मे पासून संध्या. 7 वा. #ColorsMarathi वर आणि @justvoot वर कधीही.

18

See Colors Marathi’s other Tweets

मालिकेच्या संपूर्ण टीमने भारतीय पुराण, संस्कृती, वेद, परंपरा याचा सखोल अभ्यास आणि संशोधन करून ही कलाकृती प्रेक्षकांसमोर आणली आहे. लक्ष्मीची उत्पत्ती, लक्ष्मी नारायणाची भार्या कशी बनली, या सगळ्यामध्ये शिव आणि ब्रम्ह यांचे काय योगदान आहे, अशा विविध टप्प्यांवरून मालिकेचे कथासूत्र फुलत जाणार आहे. भव्यदिव्य सेट, सुरस कथा, दमदार अभिनय, यांनी नटलेल्या “श्री लक्ष्मी नारायण” या मालिकेचे क्रिएटीव्ह डायरेक्टर संतोष अयाचित असून निर्मिती साजरी क्रिएटीव्हज यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.