भुसावळ :
जगभरात तंत्रज्ञान दिवसेंदिवस झपाट्याने बदलत असून एखादा छायाचित्रकाराने कुठल्याही समाजात तेढ निर्माण होईल असे छायाचित्रण न करता सकारात्मक दृष्टीकोनातून छायाचित्रण करावे असे प्रतिपादन आ. संजय सावकारे यांनी केले.
जागतिक छायाचित्रण दिनानिमीत्त आज १९ रोजी येथील लोणारी मंगल कार्यालयात भुसावळ फोटोग्राफर असोसिएशन तर्फेआयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सर्व प्रथम माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी, स्व. केशवराव कोल्हटकर व स्व. मोहन लोणारी यांना श्रद्धांजली वाहून आ. सावकारे, पोनि. चंद्रकांत सरोदे, सपोनि. दिपक गंधाले, विजय पाटील, श्री. राठोड, देवीसिंग पाटील, शेख सत्तार यांच्याहस्ते कॅमेरे व ड्रोन पूजन करण्यात आले. यावेळी आ. सावकारे पुढे म्हणाले की, कुणाला महत्व द्यायचे व कुणाला छायाचित्रात महत्व देऊ नये हे कार्य छायाचित्रकार करीत असतात. स्पर्धेत अनेकदा धोके पत्करतात. जागतिक स्तरावर डिस्कव्हरी व नॅशनल जीओग्राफी आदी दुरवाहिनीवर घरबसल्या पाहिल्यानंतर त्यांनी किती जोखीम पत्करुन कसे छायाचित्रण करीत असावे त्याचे आश्चर्य वाटत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी व्यासपीठावर सी. ए. गोपाळ अग्रवाल, प्रेम परदेशी, किरण पाटील, गोपी चेलानी आदींची उपस्थिती होती. सीए अग्रवाल यांनी कर संदर्भात सविस्तर माहिती दिली. डॉ. महेंद्र चौधरी यांनी सुमारे ९० छायाचित्रकारांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. दरम्यान सकाळी ९ वाजता साईबाबा मंदिर ते लोणारी मंगल कार्यालय मोटारसायकल रॅलीही काढण्यात आली होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अध्यक्ष आनंदा ठाकरे यांनी केले. यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष बबलू बरहाटे, कोषाध्यक्ष अजय शिंपी, शहर प्रमुख शंभु मेहंदळे, तालुका प्रमुख सचिन काकडे,सारंग केरहाळकर, राजू भंगाळे, राहूल पाटील,अतुल शिंदे, विनोद गोरधे, कमलेश चौधरी, महेंद्र बारहे, निलेश कोल्हाटकर, अविनाश पाटील यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.