Saturday, January 28, 2023

‘छत्रपती संभाजी महाराज मार्गा’चा बॅनर फाडल्याने साताऱ्यात तणावाचे वातावरण

- Advertisement -

मुंबई : सातारा शहरातील पोवईनाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे शुक्रवारी (९ जानेवारीला) खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. यामार्गाचे तीनही प्रवेशद्वारांना छत्रपतींची नावे देण्यात आली आहे. यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा फलक समाजकंटकाने फाडला. शनिवारी सकाळी हे निदर्शनास आले. त्यामुळे खळबळ उडाली. उदयनराजे समर्थक मोठ्यासंख्येत घटनास्थळी जमा झाले. साताऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कार्यकर्ते व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

 

शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोवईनाका येथील ग्रेड सेपरेटरचे उद्‌घाटन झाले. या तीन भुयारी मार्गांचं श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज भुयारी मार्ग, श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग आणि श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज भुयारी मार्ग असे नामकरण करण्यात आले आहे. आज सकाळी छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग हा फलक अज्ञाताने फाडल्याचे दिसले. ही माहिती समजताच पोवईनाक्यावर खासदार उदयनराजे समर्थक गोळा होऊ लागले. पोलिसांनी फाडलेला फलक काढून ताब्यात घेतला.

 

त्यानंतर उदयनराजे समर्थक ॲड. दत्तात्रेय बनकर, संग्राम बर्गे, सातारा विकास आघाडीचे नगरसेवक व कार्यकर्ते यांनी केवळ संभाजी महाराजांविषयीच असे का घडते या घटनेमागे कोण आहेत याचा पोलिसांनी शोध घ्यावा संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा आम्हाला आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा दिला. पोलिसांनी त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. कारवाई करू, असे सांगितले. कार्यकर्ते आणि पोलिस अधिकाऱ्यांत बराच वेळ चर्चा सुरू होती.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे