छत्रपती शाहू महाराजांचे कार्य नवीन पिढीला सदैव प्रेरणादायी – प्रा. किसन हिरोळे

0

फैजपूर ;- अवघ्या ४४ वर्ष कारकीर्द लाभलेल्या कोल्हापूर संस्थांनाचे आदर्श महाराजा यशवंतराव जयसिंगराव घाटगे यांना थोर प्रागतिक समाज उद्धारक, बहुजनांचा कैवारी आणि असंख्य सामाजिक सुधारणांचा जनक म्हणून वेगळी ओळख आहे. त्यांनी अस्पृश्य निवारण, स्त्रि शिक्षण, घटस्फोट आणि सती बंदीची कायदा, यासोबतच शिक्षणाचा प्रसार, बलोपासनेला प्रोत्साहन देण्यासाठी खासबाग येथे कुश्ती मैदानाची स्थापना, शेतकऱ्यांसाठी विविध योजना सामाजिक दुर्बल घटकांना आरक्षण यासारख्या विविध योजना राबवून खरा रयतेचा राजा म्हणून त्यांची कारकीर्द संस्मरणीय आहे असे मत ऐनपूर महाविद्यालयाचे इतिहास विषयाचे विभागप्रमुख प्रा किसन हिरोळे यांनी तापी परिसर विद्या मंडळ संचालित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सन आणि उत्सव समितीच्या वतीने आयोजित छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १४४ व्या जयंती निमित्त कार्यक्रमात व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवियत्री स्वगीय कुसुमताई मधुकरराव चौधरी यांच्या २५ च्या पुण्यतिथीनिमित्त श्रदांजली अर्पण करण्यात आली तसेच मनोहर गुरुजी यांच्या ९२ व्या जयंती निम्मित आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक राष्ट्रीय सन उत्सव समितीचे चेअरमन प्रा डॉ राजेंद्र ठाकरे यांनी केले. प्रास्ताविकेत प्रा डॉ राजेंद्र ठाकरे यांनी प्रमुख वाक्यांचा परिचय करून दिला आणि सोबतच समिती च्या कामाचे स्वरूप विशद केले.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ पी आर चौधरी यांनी कवियत्री स्वर्गीय कुसुमताई मधुकुरराव चौधरी यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या प्रेमळ संस्कार आयुष्यभर सोबत असल्याचे भावोद्गार काढले. त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या चरित्र्यं मधून नवीन पिढीने सत्तेचा सदुउपयोग समाजासाठी कसा करता येऊ शकतो हे शिकावे आणि प्रत्येकाने आपापली सामाजिक जबाबदारी ओळखून आपल्या परीने समाजाचे ऋण उतरविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले.
आभार प्रदर्शन प्रा शिवाजी मगर यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्राचार्य प्रा डॉ पी आर चौधरी, उपप्राचार्य प्रा डी बी तायडे, राष्ट्रीय सन आणि उत्सव समितीचे चेअरमन प्रा डॉ राजेंद्र ठाकरे, प्रा नितीन चौधरी, शेखर महाजन यांनी मार्गदर्शन व परिश्रम घेतले. कार्यक्रमाला प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.