छत्तीसगड :– छत्तीगढमधील बिजापूर येथे नक्षलवाद्यांनी समाजवादी पक्षाचे नेते संतोष पुनेमा यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना आज घडली. बिजापूर पोलीस स्टेशनहून अवघ्या १५ किमी अंतरावर घडली असून या घटनेने परिसरात भीतीचे वातावर निर्माण झाला आहे.
मरिमल्ला गावचे रहिवाशी असलेले संतोष पुनेमा बिजापूर जिल्हा समाजवादी पक्षाचे उपाध्यक्ष होते. व्यवसायाने कंत्राटदार असलेल्या पुनेमांनी २०१८मध्ये विधानसभा निवडणूकही लढवली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी संध्याकाळी पुनेमा यांची मरिमल्ला येथील एका कन्सट्रक्शन साइटवरून अपहरण केलं. आज सकाळी येथील घनदाट जंगलामध्ये नक्षलवाद्यांनी त्यांची हत्या केली आहे. हत्येचे कारण मात्र अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहेत.