पाचोरा तालुक्यात १०९ गावांमध्ये भिषण पाणी टंचाईचे सावट
पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यात एप्रिल ते जून महिन्या अखेर १२६ पैकी १०९ गावांमध्ये भिषण पाणी टंचाचे सावट निर्माण झाले असून टॅकरने पाणी पुरवठा करणे, नवीन ईधन विहिरी,तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना, विहिरी खोल करणे, विहिरी अधिग्रहित करून तातडीने पाणी पुरवठा सुरळीत करा योजना राबविण्यास पैसे अपुर्ण पडत असतील तर ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाचतुन टंचाईचे कामे करुन टंचाईला सामोरे जा . टंचाई निवारणार्थ चे कोणी अधिकारी व कर्मचारी हलगर्जीपणा करत असतील कठोर कारवाई करुन त्यांना बिना वेतन करवाई करण्याच्या सूचना आमदार किशोर पाटील व उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांनी पाणी टंचाई आढावा बैठकीत दिल्या.
यावेळी तहसीलदार बी. ए. कापसे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी पालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील,पद्दमशिंग पाटील, दिपक राजपूत अरुण पाटील ग्रामिण पाणीपुरवठा उपाभियंता एस. एस. पवार , रमेश वानखेडे,तालुका कृषी अधिकारी दिपक ठाकुर सह विविध खात्यांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
पाचोरा तालुक्यात सतत तिन चार वर्षांपासून अत्यल्प पाऊस झाल्याने पाणी पातळी खोलवर जात आहे कमी पावसामुळे बहुतांशी प्रकल्पात जलसाठा शिल्लक नसल्याने दिवसेंदिवस पाणी टंचाई वाटत आहे, तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाई लोहारा,कुर्हाड खु. भोजे,सातगाव (डोंगरी) पिंपळगाव हरे, या गावामधे असल्याने लोहारा येथे दोन टॅंकर द्वारे आठ फेऱ्या करुन टंचाईला सामोरे जात आहे,तर कुर्हाड खु व भोजे येथे १५/२० दिवस पाणी येत नसल्याने संतप्त नागरिकांनी ग्रामसेवकांचा खोटारडेपणा उघडा पडला,तर सातगाव डोंगरी येथे विहिर अधिग्रहित करून दोन महिने होऊनही ग्रामसेकास माहिती नसल्याने या ग्रामसेवकाची चांगलीच कानउघाडणी केली.
तालुक्यात वडगांव बु.प्र,पा, सातगाव डोंगरी,वेरुळी बु,खु. कासमपुरा,घुसर्डी, सारोळा खु,चिंचखेडा खु, या आठ गावात विहिरी अधिग्रहित करून ,४४ गावात विहिरी खोलीकरण करणेचा प्रस्थाव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला आहे, सोळा गावांना विधन विहिरी घेण्यात आल्या आहेत, भातखंडे येथे तात्तपुरती पाणी पुरवठा योजना वडगांव कडे येथे १६ लाखाची विशेष दुरुस्ती योजना भोजे गावांसाठी सार्वे-पिंप्री प्रकल्पातुन २० लाखाची तात्पुरती पाणी पुरवठा योजना तर म्हसास व रामेश्वर या गावांसाठी टॅंकरने पाणी पुरवठा साठी ग्रामिण पाणीपुरवठा विभागाकडून जिल्हा प्रशासनाला प्रस्थाव पाठविले आहे.