Thursday, February 2, 2023

चौथ्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेची आत्महत्या

- Advertisement -

धायरी, लोकशाही न्यूज नेटवर्क  

सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉल समोरील सोसायटीमध्ये चौथ्या मजल्यावरून उडी मारून २६ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

राधिका पवन ससाने हे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. घटनेची माहिती महिलेचे पती पवन नाना ससाने (रा. माधुरी मिलिंद कॉम्प्लेक्स, वडगाव बुद्रुक, पुणे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दिली आहे.

- Advertisement -

वडगाव बुद्रुक येथील माधुरी मिलिंद कॉम्प्लेक्समध्ये पवन व राधिका हे दोघे विवाहित जोडपे राहत आहेत. आज शनिवारी सकाळी साडे आठच्या दरम्यान राधिकाने चौथ्या मजल्यावरून उडी मारल्याने ती गंभीर जखमी झाली होती. याबाबत माहिती मिळताच नातेवाईकांनी उपचार कामी ससून हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करत आहे.

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे